महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान...
चंद्रपूर, दि. २४ ऑगस्ट २०२६: महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील योगदानाबद्दल 'द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) संस्थेचा 'एमिनेंट इंजिनियर’ हा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती येथे शुक्रवारी (दि. २१) राज्याचे महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
‘आयईआय’च्या ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनाचे अमरावती येथे शुक्रवारी (दि.२१) उद्घाटन झाले. या अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय: एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या विषयावर विचारमंथन झाले. सायंकाळच्या सत्रात ‘आयईआय’च्या वतीने जाहीर झालेला 'एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना महसूलमंत्री श्री. चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार श्री. प्रवीण पोटे, आमदार श्री. प्रवीण तायडे, 'द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स'चे (भारत) अध्यक्ष श्री. मनिष कोठारी, पदाधिकारी श्री. आनंद जवंजाळ, श्री. राम विघे, श्री. आर. आर. तंवर, श्री. सुनील राठी आदींची उपस्थिती होती.
‘अभियंता हे देशाच्या जडणघडणीचे शिल्पकार आणि मानवी प्रगतीचे शिलेदार आहेत. भारताच्या अभियंत्यांनी अफाट कौशल्याच्या जोरावर जगात अव्वल स्थान निर्माण केले आहे. जगातील सर्वोत्तम अभियंते भारतात आहेत. विद्युत क्षेत्रातील अभियंत्यांची अद्भूत कार्यक्षमता ऊर्जामंत्री म्हणून काम करताना मी जवळून अनुभवली आहे. एलिफंटा बेटासारख्या दुर्गम ठिकाणी समुद्रामधून भूमिगत वाहिनीद्वारे वीज पोहोचवण्याचे अशक्यप्राय आव्हान महावितरण व महापारेषणच्या अभियंत्यांनी लिलया पेलले. हा प्रकल्प म्हणजे भारतीय अभियांत्रिकीच्या कौशल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे!’ अशा शब्दांत महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभियंत्यांचा सन्मान केला. याआधीच्या सत्रात संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी विकसित भारत २०४७ चे ऊर्जा उद्दिष्ट: आधुनिक ऊर्जा सुलभतेचा आराखडा आणि महाराष्ट्राची आघाडी’ या विषयावर सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
देशातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था असलेल्या 'द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया'ची स्थापना १९२० मध्ये झाली आहे. कोलकाता मुख्यालय असलेल्या या संस्थेचे देशभरात १२५ पेक्षा अधिक स्थानिक केंद्र आहेत. विद्युत क्षेत्रामधील ३७ वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. राजेंद्र पवार यांचा या संस्थेकडून 'एमिनेंट इंजिनियर’ राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.
फोटो नेम- Shri . Rajendra Pawar Director HR MSEDCL 22-08-2026
फोटो ओळ – अमरावती येथे 'एमिनेंट इंजिनियर’ हा पुरस्कार महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना प्रदान करण्यात आला.
लोहमार्ग पोलीस भरतीतील OBC प्रतीक्षायादी तातडीने जाहीर करा – आ. किशोर...
मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२६ मधील OBC प्रवर्गाची प्रतीक्षायादी (वेटिंग लिस्ट)...
अखेर नरभक्षी T-120 वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश विधिमंडळ...
दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील हळदा-आवळगाव परिसरात दहशत निर्माण करणारी नरभक्षी T-120 वाघीण अखेर वनविभागाच्या विशेष मोहिमेत जेरबंद करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा...
एसआयआर मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 331 मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण Ø 165 नवीन...
चंद्रपूर, दि.20 : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 1200 पेक्षा जास्त मतदार असलेल्या 331 मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत...
प्रकाशकांनी 30 जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे
विवरणपत्र दखल न केल्यास 10 हजारांचा दंड
मुंबई /चंद्रपूर, दि. 23 : प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, 2023 अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित...
महावितरणची ‘स्मार्ट’ क्रांती: चंद्रपूर परिमंडळातील ग्राहकांची ६४.१ लाखांची मोठी आर्थिक बचत
चंद्रपूर ११ ऑगस्ट २०२६:- वाढत्या महागाईच्या काळात सामान्य ग्राहकांच्या खिशाला होणारी कात्री लक्षात घेता, महावितरणने राबविलेली ‘स्मार्ट टीओडी’ (Time Of Day) मीटर योजना चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील...
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा पहिल्याच करारातून ८९.६०...
मुंबई, दि. २४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार...
जिल्हाधिका-यांकडून पीसीपीएनडीटीच्या अंमलबजावणीचा आढावा
चंद्रपूर, दि.24 : गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र, गर्भलिंग निवडीस प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि. 24) आढावा घेतला.
जिल्हाधिकारी...
सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न अधिवेशनात; आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाचे वेधले...
चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कामगार (सफाई कुली/रेजा) यांच्या वारसांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची दखल घेत काही दिवसांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषणस्थळी...
पावसाळ्यात सावध राहा: स्वतःला आणि कुटुंबाला करा सुरक्षित! महावितरणचे आवाहन
नागपूर, दि. 3 जुलै 2026: पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे रूप खुलते, पण याचसोबत विजेच्या अपघातांचा धोकाही वाढतो. वीज डोळ्यांना दिसत नसली तरी तिचे परिणाम जीवघेणे ठरू...































