
महावितरण कंपनीचे माननीय श्री धनंजय औंढेकर संचालक (संचलन) साहेब सांघिक कार्यालय मुंबई यांनी चंद्रपूर परिमंडळ येथे बैठक परिसंवाद साधण्याकरीता आले असतानां, त्यांनी प्रसिद्ध श्री महाकाली मंदिर चंद्रपूर येथे भेट दिली.मंदिर परिसराची माहिती घेऊन मंदिर व्यवस्थापनाशी चर्चा करतांना माननीय संचालक (संचलन) साहेबांनी मंदिरामध्ये कार्यान्वित असलेले ०५ किलो वॅट क्षमतेचे सोलर रूफटॉप प्रकल्प व अधिकची विजेची मागणी असल्याने येत असलेल्या वीज विलासंबंधी चर्चा केली.तथापि यावर उपाय म्हणून उपस्थित अभियंता तथा कर्मचारी व सोलर एजन्सी यांनी अभियंता दिनाचे औचित्य साधून माननीय संचालक (संचलन) साहेब यांच्या उपस्थितीत मंदिर परिसरातील उर्जेमध्ये स्वयंपूर्णता करण्याकरिता अधिकचे १० किलो वॅट क्षमतेचे सोलर रूफटॉप प्रकल्प व अंचलेश्वर महादेव मंदिर येथे ०५ किलो वॅट क्षमतेचे सोलर रूफटॉप प्रकल्प बसविण्याकरिता पुढाकार घेतला. यावेळी माननीय संचालक (संचलन) साहेबांनी सोलर एजन्सीने घेतलेल्या पुढाकारामुळे श्री महाकाली मंदिराचे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे असे मत व्यक्त केले.याप्रसंगी चंद्रपूर परिमंडळाचे माननीय मुख्य अभियंता श्री हरीश गजबे साहेब अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा)श्री रमेश सानप साहेब, अधीक्षक अभियंता श्री मनोज धाबर्डे साहेब, अधीक्षक अभियंता श्री प्रकाश खांडेकर साहेब तसेच ईतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















