Home Breaking News गोंडवाना विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ आपल्या गावात’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची एकदिवसीय क्षेत्रभेट

गोंडवाना विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ आपल्या गावात’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची एकदिवसीय क्षेत्रभेट

2
चंद्रपूर ,20ऑगस्ट २०२६
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे घटक महाविद्यालय  आदर्श पदवी महाविद्यालया अंतर्गत ‘विद्यापीठ आपल्या गावात’ या उपक्रमांतील जांभळी, बिबी व निमणी येथील विद्यार्थ्यांसाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली (जि. चंद्रपूर) येथे एकदिवसीय शैक्षणिक क्षेत्रभेट नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या क्षेत्रभेटीत सुमारे ७६ विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला.
या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना बांबूच्या विविध जाती, त्यांची वैशिष्ट्ये, लागवड, संवर्धन तसेच बांबूचे विविध उपयोग याबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती घेणे  हा होता. विद्यार्थ्यांनी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील विविध विभागांना भेट देत बांबू रोपवाटिका, बांबू बगीचा आणि विविध प्रजातींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी केंद्रातील मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना बांबूच्या विविध जातींची ओळख, त्यांचे उपयोग आणि लागवडीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
क्षेत्रभेटीदरम्यान बांबूपासून विविध उपयोगी व आकर्षक वस्तू कशा तयार केल्या जातात, याचेही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. बांबूच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होऊ शकतात, याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. डिजिटल माध्यमांसह प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना बांबूविषयी अधिक सखोल व उपयुक्त ज्ञान मिळाले.
या क्षेत्रभेटीस आदर्श पदवी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे  प्राचार्य (प्र.) डॉ. विवेक जोशी, महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स चंद्रपूरचे  प्राचार्य  डॉ. शैलेन्द्र देव, ‘विद्यापीठ आपल्या गावात’ उपक्रमाचे समन्वयक डॉ. महेंद्र वर्धलवार आणि लिपिक प्रवीण गिरडकर उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यांसोबत आशीष देरकर, उमेश राजूरकर, श्वेता बावने, मंगेश कळते व इतर शिक्षक उपस्थित होते.
या क्षेत्रभेटीस बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली (चंद्रपूर) येथील  सतीश शेंडे (आरएफओ), श्री शिवणकर,  श्री . गजभिये सर व मेश्राम सर यांचे सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ प्रशासन तसेच आदर्श पदवी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे, कौशल्यविकासाला चालना मिळावी आणि स्थानिक संसाधनांमधून रोजगाराच्या संधींची ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरली.
00000

The views and opinions included in this email belong to their author and do not necessarily mirror the views and opinions of the university. Our employees are obliged not to make any defamatory clauses, infringe, or authorize infringement of any legal right. Therefore, the university will not take any liability for such statements included in emails. In case of any damages or other liabilities arising, employees are fully responsible for the content of their emails