Home Breaking News वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये प्रकल्पप्रभावित सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी...

वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये प्रकल्पप्रभावित सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी द्यावी – रघुवीर हं. अहीर क्षेत्रीय महाप्रबंधकासोबत शिष्टमंडळासह सविस्तर चर्चा

2

चंद्रपूर:- वेकोलि खाण प्रभावित क्षेत्रातील सुशिक्षित व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या बेरोजगार युवकांना क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत खासगी कंपन्यांमध्ये राज्य शासनाच्या 80/20 या धोरणानुसार रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्षयुवा नेते रघुवीर अहीर यांनी दि. 20 ऑगस्ट 2026 रोजी वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. संजय मिश्रा यांचेशी झालेल्या चर्चेतून केली.

वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्राशी निगडीत अनेक गावांमध्ये सुशिक्षित बेरोजगार मोठ्या संख्येत असतांना त्यांना स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या कंपन्यांमध्ये रोजगार नाकारल्या जात आहे. या उलट परप्रांतीयांना नोकऱ्या देऊन स्थानिकांवर अन्याय केला जात आहे. प्रकल्पपिडीत गावात अनेक सुशिक्षित युवक बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. अनेक युवकांनी आयटीआय व अन्य संस्थातून व्यावसायिक प्रशिक्षण घेतले असतांना त्यांना रोजगारापासून डावलणे योग्य नसून या प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी देऊन न्याय द्यावा अशी मागणी या भेटीदरम्यान रघुवीर अहीर यांनी वेकोलि क्षेत्रीय महाप्रबंधक व अन्य संबंधित अधिकाऱ्यांकडे केली.

प्रस्तुत मागणी योग्य असल्याचे मान्य करून प्रकल्प प्रभावित गावातील सुशिक्षित व व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या बेरोजगार युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याचे आश्वासन मा. क्षेत्रीय महाप्रबंधकांनी या चर्चेदरम्यान दिले. याबाबत लवकरच निर्णय घेऊन स्थानिकांना रोजगार दिला जाईल असेही त्यांनी या भेटीदरम्यान स्पष्ट केले. स्थानिकांच्या न्यायासाठीरोजगार संधीसाठी व युवकांच्या भविष्यासाठी सतत पाठपुरावा केला जाईल असेही रघुवीर अहीर यांनी या चर्चेप्रसंगी सांगितले.

रघुवीर अहीर यांच्या नेतृत्वात क्षेत्रीय महाप्रबंधकांसोबत भेटलेल्या शिष्टमंडळात सर्वश्री. नगरसेवक गणेश पिंपळकरमयुर भोकरेपवन पुरेल्लीइंद्रजीतसलीम शेखशैलेश दिंडेवारसुरज मोरपाकारमन तांद्रावंशी महाकालीअनुप भंडारीरवि देवगीरकररक्षित सुंदरगीरी आदींची उपस्थिती होती.