Chandrapur samachar logo

0

वरोरा येथील एकोना कोळसा खाणीतील तीव्र ब्लास्टिंग थांबवा; खासदार प्रतिभा धानोरकर* *उपविभागीय अधिकारी...

0
चंद्रपूर : वरोरा शहराच्या अगदी लगत असलेल्या वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या (वेकोलि) एकोना कोळसा खाणीत दररोज दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास होणाऱ्या अत्यंत तीव्र...

महसूल लोक अदालतीमध्ये अधिवक्ता व पक्षकारांनी सहभागी व्हावे ...

0
चंद्रपूर, दि. 25 : राज्यात महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने निकाली काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राज्यात...

शेतकऱ्यांनो दलालांपासून सावधान…. * खासदार धानोरकर आणि माजी आमदार धोटे यांनी गोंडपिपरी एमआयडीसी...

0
  तालुक्यात एमआयडीसीचा मुद्दा ऐरणीवर आहे.याला घेऊन शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आहे.हक्काची शेती जाणार,या भीतीने सारे त्रस्त आहेत.शेतकरी संघर्षासाठी तालुक्यात दोन समित्या कार्यरत आहे.मात्र स्वयंघोषित नेते...

देशाला कर्जबाजारी व महागाई च्या खड्ड्यात लोटण्याचे महापाप भाजप सरकारचे – विधिमंडळ पक्षनेते आ....

0
 केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या जनविरोधी, शेतकरीविरोधी आणि युवकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज सिंदेवाही येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विराट जनआक्रोश...

चंद्रपूरमध्ये सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवांचा शुभारंभ ICMR पडोली येथे कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर...

0
चंद्रपूर, दि. 24 : सिकलसेल व थालेसेमियासारख्या अनुवंशिक रक्तविकारांनी ग्रस्त रुग्णांना दर्जेदार, वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने चंद्रपूर जिल्ह्याने...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत

मुंबई, दि. २४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार...

एकजुटीच्या प्रयत्नातून सुरक्षित मातृत्वाचा प्रवास दुर्गम घोडणकप्पीत आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश पाटण...

0
चंद्रपूर, दि. 24 : दुर्गम भाग, आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यातील अडचणी आणि जोखमीची गर्भावस्था... अशा अनेक आव्हानांवर मात करत आरोग्य विभागाचे कर्मचारी, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी...

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर...

चंद्रपूर, दि. २४ ऑगस्ट २०२६: महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील योगदानाबद्दल 'द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) संस्थेचा 'एमिनेंट इंजिनियर’ हा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती येथे शुक्रवारी (दि. २१) राज्याचे महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. ‘आयईआय’च्या ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनाचे अमरावती येथे शुक्रवारी (दि.२१) उद्घाटन झाले. या अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय: एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या विषयावर विचारमंथन झाले. सायंकाळच्या सत्रात ‘आयईआय’च्या वतीने जाहीर झालेला 'एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना महसूलमंत्री श्री. चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार श्री. प्रवीण पोटे, आमदार श्री. प्रवीण तायडे, 'द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स'चे (भारत) अध्यक्ष श्री. मनिष कोठारी, पदाधिकारी श्री. आनंद जवंजाळ, श्री. राम विघे, श्री. आर. आर. तंवर, श्री. सुनील राठी आदींची उपस्थिती होती. ‘अभियंता हे देशाच्या जडणघडणीचे शिल्पकार आणि मानवी प्रगतीचे शिलेदार आहेत. भारताच्या अभियंत्यांनी अफाट कौशल्याच्या जोरावर जगात अव्वल स्थान निर्माण केले आहे. जगातील सर्वोत्तम अभियंते भारतात आहेत. विद्युत क्षेत्रातील अभियंत्यांची अद्भूत कार्यक्षमता ऊर्जामंत्री म्हणून काम करताना मी जवळून अनुभवली आहे. एलिफंटा बेटासारख्या दुर्गम ठिकाणी समुद्रामधून भूमिगत वाहिनीद्वारे वीज पोहोचवण्याचे अशक्यप्राय आव्हान महावितरण व महापारेषणच्या अभियंत्यांनी लिलया पेलले. हा प्रकल्प म्हणजे भारतीय अभियांत्रिकीच्या कौशल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे!’ अशा शब्दांत महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभियंत्यांचा सन्मान केला. याआधीच्या सत्रात संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी विकसित भारत २०४७ चे ऊर्जा उद्दिष्ट: आधुनिक ऊर्जा सुलभतेचा आराखडा आणि महाराष्ट्राची आघाडी’ या विषयावर सादरीकरणाद्वारे माहिती दिली. देशातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था असलेल्या 'द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया'ची स्थापना १९२० मध्ये झाली आहे. कोलकाता मुख्यालय असलेल्या या संस्थेचे देशभरात १२५ पेक्षा अधिक स्थानिक केंद्र आहेत. विद्युत क्षेत्रामधील ३७ वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. राजेंद्र पवार यांचा या संस्थेकडून 'एमिनेंट इंजिनियर’ राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. फोटो नेम- Shri . Rajendra Pawar Director HR MSEDCL 22-08-2026 फोटो ओळ – अमरावती येथे 'एमिनेंट इंजिनियर’ हा पुरस्कार महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना प्रदान करण्यात आला.

0