लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेत नव्याने...
चंद्रपूर टायगर सफारी प्रकल्पाला वेग, वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर वन्यजीव बचाव केंद्र आणि अत्याधुनिक रेस्क्यू प्रणालीवरही सविस्तर चर्चा
जिल्ह्याच्या पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्या प्रस्तावित...
अपघातानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या वृध्देला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार
मुंबई/ चंद्रपूर, दि. 3 : गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या 100 वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या 24 तासांत आर्थिक...
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर ‘द इन्स्टिट्यूशन ऑफ...
चंद्रपूर, दि. २९ जून २०२६: महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील गेल्या ३७ वर्षांच्या योगदानाची दखल घेत 'द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स’ (भारत) संस्थेच्या वतीने त्यांना 'एमिनेंट इंजिनियर’ हा देशपातळीवरील मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अमरावती येथे येत्या २१ व २२ ऑगस्टला आयोजित ‘आयईआय’च्या ४१ व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनामध्ये संचालक श्री. राजेंद्र पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या दोन दिवसीय अधिवेशनात ‘विकसित भारताचे ध्येय: एआय आणि हरित तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा क्षेत्राचा कायापालट’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. देशाच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व सर्वात मोठी व्यावसायिक संस्था असलेल्या 'द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडिया'ची स्थापना १९२० मध्ये झाली आहे. कोलकाता मुख्यालय असलेल्या या संस्थेचे देशभरात १२५ पेक्षा अधिक स्थानिक केंद्र आहेत.
श्री. राजेंद्र पवार यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता ते मुख्य अभियंता पदापर्यंत काम केले आहे. या ३६ वर्षांच्या कालावधीत प्रामुख्याने ग्रामीण भागातील दऱ्याखोऱ्यांसह घरगुती, शेती, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रात नवीन वीजयंत्रणा उभारणे, नवीन वीजजोडण्या आणि सुरळीत वीजपुरवठ्यासाठी उल्लेखनीय कामे केली आहेत. एप्रिल २०२५ पासून श्री. पवार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून कार्यरत आहे. विद्युत क्षेत्रात श्री. राजेंद्र पवार यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना आयईआय संस्थेकडून हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न अधिवेशनात; आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाचे वेधले लक्ष ...
चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कामगार (सफाई कुली/रेजा) यांच्या वारसांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची दखल घेत काही दिवसांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषणस्थळी...
मोठी स्वप्ने पाहा; ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्राचा गौरव वाढवा! – आ. सुधीर...
चंद्रपूर : मनात कधीही छोटी स्वप्ने बाळगू नका. ज्ञान, जिद्द आणि कर्तृत्वाच्या बळावर स्वतःचे, गावाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करा. मारोडा या भूमीने कर्मवीर...
डोलीतील चिमुरडीवरील अमानुष अत्याचार प्रकरण गंभीर, आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्र्यांकडे उज्ज्वल निकम यांच्या...
द्रपूर शहरालगतच्या पडोली परिसरात पाच वर्षीय निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र...
चंद्रपूरातील पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा औचित्याचा मुद्दा
चंद्रपूर शहराजवळील मोरवा गावानजिक घडलेल्या अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज...



























