Home सामाजिक लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

8
: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ, फुले व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. राज्यभर राबविण्यात येणाऱ्या शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव मा.राहुलजी सराफ, नगरसेवक मा. प्रदीपजी देशमुख आणि माजी विद्यार्थी ॲड. आशिष मुंधडा, श्री. प्रफुल बैरम, अमोल घोडमारे मुख्याध्यापक श्री. राजपुरोहित सर,उपमुख्याध्यापक जहागिदार सर, पर्यवेक्षिका सौ. देगमवार मॅडम, पर्यवेक्षक श्री. पदलमवार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्वागतगीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रेरणादायी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.तसेच हरितसेनेच्या विद्यार्थ्यांच्या उपक्रमांतर्गत पाच वृक्ष लावण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले