Home सामाजिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून विक्रमी रक्तदान; १४ शिबिरांत १,०७० रक्तदात्यांचा सहभाग

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून विक्रमी रक्तदान; १४ शिबिरांत १,०७० रक्तदात्यांचा सहभाग

6

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह उत्साहात राबविण्यात येत आहे. १५ जुलैपासून सुरू झालेल्या या सेवा सप्ताहांतर्गत विविध सामाजिकआरोग्य व जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असूनमतदारसंघातील ५६ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मळित असूनरविवारी आयोजित करण्यात आलेल्या १४ रक्तदान शिबिरांमध्ये विक्रमी रक्तदान झाले असून तब्बल १ हजार ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.

             रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताचा तुटवडा भासू नयेया उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सेवा सप्ताहात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. युवकमहिलासामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवित रक्तदान केले.

           रविवारी पाताळेश्वर मंदिर परिसरभिवापूरगुरुद्वारास्वातंर्त्यवीर सावरकर सभागृहवडगावघुग्घूसविठ्ठल मंदिर वॉर्ड तसेच इतर विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे पार पडली. प्रत्येक केंद्रावर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केलेत्यामुळे सर्वच शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

           आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध शिबिरांना भेट देत रक्तदात्यांचे अभिनंदन केले. समाजासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले कीएका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मळिू शकते. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

           १५ ते २३ जुलैदरम्यान सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह रक्तदान शिबिरांसह महाआरोग्य शिबिरेयोग शिबिरेवृक्षारोपणधार्मिक कार्यक्रमदिव्यांग बांधवांना साहित्य वितरणगुणवंत व उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार तसेच विविध जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावाअसे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.