Home Breaking News जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी निदर्शने आंदोलन

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी निदर्शने आंदोलन

11

NEET नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी दिल्ली येथील जंतरमंतर वर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी चंद्रपुरात आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी , सामाजिक , धार्मिक राजकीय संघटनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले . NEET नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकषीची मागणी तथा याला जबाबदार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या प्रमुख मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे वतीने ६ जून पासूनआंदोलन उभारण्यात आले आहे . .या आंदोलनात प्रसिद्ध पर्यावरणवादी , वैज्ञानिक सोनम वांगचुक यांच्या सह २० विद्यार्थी २२ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले . मात्र काल सोनम वांगचुक यांना सरकारने बळजबरीने दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटल मध्ये अमानवीय पद्धतीने दाखल केले ..या घटनेचा निषेध देशभरात करण्यात येत आहे . त्या पार्श्वभूमिवर येथील विद्यार्थी व सामाजिक संघटनांमार्फत आज जिल्हाधिकारी कार्यालयात समोर ‘लक्षवेधी निदर्शने आंदोलन ‘ करण्यात आले . यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील अनेक संघटनांचे प्रतिनिधी विद्यार्थी यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला तथा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा व सोनम वांगचुक यांना ससन्मान आंदोलनात परत पाठवावे अशा आशयाची मागणी केली . यावेळी देशाचे राष्ट्रपती महोदया यांना मा जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले . या निवेदनात NEET नीट परीक्षेत्रील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी . विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक धोरणे मागे घेऊन शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करावी आदींचा समावेश आहे . निवेदनावर विविध संघटनांचे प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली यात किशोर पोतनवार , रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण ऊर्फ बाळु खोबागाडे , सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे बळीराज धोटे , नगरसेवक नंदु नागरकर , काँग्रेसचे प्रवीण पळवेकर , सुरेश नारनवरे, सचिन राजुरकर , किशोर तेलतुंबडे ,डॉ. गावतुरे , कृष्णा मसराम , सुर्यकांत खनके अँड आर डब्लू. रंगारी ऍड अजीत भडके आदींचा समावेश आहे .

  या आंदोलनात शहरांतील विविध सामाजिक राजकीय संघटनांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक जिल्ह्यातील हजारों विद्यार्थी तथा आम नागरिक सहभागी झाले होते . यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता