
चंद्रपूर : विद्यार्थ्यांनो आज स्पर्धेचे युग आहे. या युगात टिकून राहण्यासाठी व आपले स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. आपला आत्मविश्वास चिरंतर टिकून राहणे यासाठी अत्यावश्यक आहे. जीवनात यश मिळविण्यासाठी अगदी शालेय शिक्षणापासून आपले ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी आमदार प्रा. अतूल देशकर यांनी केले.
चंद्रपूर-गडचिरोली ब्राह्मण सभेतर्फे येथील शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात दहावी, बारावी, पदवी व पदव्यूत्तर शिक्षणामध्ये आपल्या गुणवत्तेचा परिचय देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रम शनिवार दि. १८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सुनिल पुराणकर, प्रमुख पाहूणे म्हणून अॅड. शैलेश मुंजे, डॉ. पंत, डॉ. राम भारत, सचिव सचिन सांबरे व प्रा. डॉ. महेश यार्दी यांची उपस्थिती होती.
अभ्यासा सोबतच विद्यार्थ्यांनी विविध कलेची जोपासन करुन आपले जीवन समृध्द करावे. यामुळे आपले मानसिक व शारिरीक आरोग्य स्वस्थ राहते. विद्यार्थ्यांनी गुणवंत व किर्तीवंत होऊन आपल्या जीवनाला आत्मविश्वासाची जोड द्यावी असा मौलिक सल्ला अॅड. शैलेश मुंजे यांनी दिला. अध्यक्षस्थानी असलेल्या अॅड. सुनिल पुराणकर यांनी देखील विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होऊन आपल्या समाजाचा व देशाचा गौरव वाढवावा तसेच जीवनात खुप मोठे व्हा. पणआपल्याआई-वडिलांनाविसरुनकाअसा
मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे संचालन स्वाती घरोटे यांनी तर आभार शरयु मैत्र यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. महेश यार्दी, महेश ताम्हण, राजु तांबोळी, वैशाली अलोणे, राणी तांबोळी, मृणाला, चिंचाळकर, अनंत त्रिणेकर, सौरभ जोशी, मारोती महाराज, शैलेश दिक्षित, राजकुमार चंद्रात्रे तसेच अनेक समाजबांधवांनी प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष सहकार्य केले. या कार्यक्रमाला पालक व पाल्यांसोबतच गणमान्य नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शविली.
*दहावीतील गुणवंत विद्यार्थी*
धनश्री मोहितकर (९६.४०%), कैवल्य अवताडे (९६ %), आदित्य महाजन (९३.४०%), सर्वेश खोंड ९३%), सोहम मुंजे (९२. २०%), कनक केकतपुरे (९२%), आर्या पांडे (९१.८०%), अंकुश अंदणकर (९०.२०%), मुग्धा आग्रे (८९.८०%), ओम विघ्नेश्वर (८७. ४०%), समर्थ प्रकाश अंदणकर (८६.६६%), अपूर्व सांबरे (८५ %), मुग्धा पुरंदरे (८५%), कार्तिकी मंगेश मुळे (८३. २०%), शंतनू तांबोळी (८१.६०%), शिव बाटवे (७१%), कस्तुरी देशपांडे (६६.२०%), सार्थक टप्पे (६३.६०%) यांचा समावेश आहे.
*बारावीतील गुणवंत विद्यार्थी*
मयुरेश ताम्हण (९३.५०%), कनक मंगेश देशमुख (८९.३३%), कार्तिक मंगेश देशमुख (८७. १७%), सनवीत कडवजीवार (८५.६०%), सुमेध रेशीम वाले (७८. ३३%), यशदा योगेश कुलकर्णी (७५.५०%), अनया देशमुख (७४.४०%) टक्के, मुग्धा शिरपुरे (७३.६७%), आयुष तांबोळी (७३.३%), अमृता विवेक पुराणकर (८३.६७%), वैष्णवी आवळे (७७%), अर्जुन चंद्रात्रे (६७%) यांचा समावेश आहे. एमबीबीएस परिक्षेत डॉ. आयुष देवईकर व डॉ. पार्थ वनकर यांनी यश संपादन केले. यानिमित्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सत्कारमूर्तीचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जागृती फाटक, निता पंत व क्षमा बारस्कर (धर्मपुरीवार) यांचा समावेश होता. यावेळी घुग्घूस नगरपरिषदेच्या नगरसेविका मधु तिवारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रिडा क्षेत्रात अविका कुळकर्णी, भरतनाट्सम स्पर्धेत पिनाकी अलोणी व पीएचडी प्राप्त सत्कामुर्तीमध्ये प्रा. डॉ. महेश यार्दी यांचाही सत्कार करण्यात आला.
*पदवीतील गुणवंत विद्यार्थी*
कृपा गोविंद सदाफळ बीसीसीए (सीजीपीएस ८.८२), कस्तुरी अभिजीत चिंचाळकर बीसीसीए (सीजीपीएस ८.३६), श्रीरंग अनिल खोंड बीबीए (सीजीपीएस ७.४०), तनवी पांडुरंग मोहरील बीबीए (सीजीपीएस ७.२३), कस्तुरी नितीन भोपे बीसीसीए (६.८८), श्रीनिधी विशाल डबले, बी.एस्सी कंप्यूटर साइंस (८.२०), सोहम चंद्रशेखर जोशी, बी.टेक, कंप्यूटर इन्जीनियरिंग, कु. मृणाल उमेश लाभे, बी.टेक.सीएस (८.९७)























