
चंद्रपूर: चंद्रपूरात नवजात शिशुची अवैध विक्री प्रकरणी भारतीय जनता पार्टी चे महिला पदाधिकाऱ्यांना रामनगर पोलिसांनी काल अटक केलेली,ह्या प्रकरणात हे दोन महिला चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या स्थानिक आमदारांची अनेक वर्षांपासून विश्वासू आहेत. म्हणून या प्रकरणात कोणत्या ही पक्षाच्या किंव्हा कोणाच्याही दबावात न येता निष्पक्ष चौकशी करा. तसेच यांच्या संपत्तीची ही चौकशी करा या आरोपीना कठोर शिक्षा होणार याची दक्षता घ्या ही मागणी घेऊन आज शिवसेना चंद्रपूर च्या वतीने मनीषा ताई कायंदे (पक्ष सचिव),कृपालजी तुम्हाणे (लोकसभा संपर्क प्रमुख), व किरण भैया पांडव (पूर्व विदर्भ संघटक) यांच्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकुर यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून पत्र देण्यात आले, यावेळी महानगरप्रमुख भरत जी गुप्ता, उपजिल्हाप्रमुख माया ताई मेश्राम, तालुका प्रमुख अंजु लेनगुरे, विधानसभा प्रमुख सीमा ताई रामेडवार, प्रियंका गुप्ता, शितल ढाले व इतर शिवसैनिकांची उपस्तीथी होती.























