
गडचिरोली, दि. १६ सप्टेंबर २०२६: लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडच्या भविष्यातील विस्तारीकरणाच्या योजनेसाठी मागणीप्रमाणे वाढीव भारासह दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल. तसेच तत्पर वीजसेवेसाठी कायमच प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही महावितरणचे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी दिले.
जिल्ह्यातील कोन्सारी (ता. चार्मोशी) येथील लॉयड्स मेटल्समध्ये संचालक श्री. धनंजय औंढेकर यांनी शनिवारी (दि. १५) भेट दिली व वीजपुरवठ्याबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लॉयड्स कंपनीच्या सुरजागड (खाणकाम) आणि कोन्सारी (प्रक्रिया प्रकल्प/स्टील प्लांट) या दोन्ही प्रकल्पांना महावितरणकडून स्वतंत्र दोन वीजजोडण्यांद्वारे ७२ एमव्हीए क्षमतेचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. या भेटीत संचालक श्री. औंढेकर यांनी कंपनीमधील वीजपुरवठ्याचा आढावा घेतला व संबंधित यंत्रणेची पाहणी केली. लॉयड्स कंपनीकडून भविष्यात प्रकल्प विस्तारीकरणाची योजना आहे. त्यासाठी महावितरणकडून मागणीप्रमाणे विजेचा भार व पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही श्री. औंढेकर यांनी दिली.
यावेळी मुख्य अभियंता श्री. हरिश गजबे, अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश खांडेकर, लॉयड्स कंपनीच्या इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक (संचालन) श्री. अरिंदम चंदा व श्री. अमूल्य साबत (प्रकल्प), उपमहाव्यवस्थापक श्री. एस. प्यारे लाल (संचालन), वरिष्ठ व्यवस्थापक श्री. राहुल रामगिरवार (प्रकल्प), व्यवस्थापक श्री. शुभम कुमार (प्रकल्प), विभागप्रमुख (प्रशासन) श्री. वेणू गोपाळ, कार्यकारी अभियंता श्री. जितेंद्र वाघमारे आदींची उपस्थिती होती.
फोटो नेम – DoP Sir Visit to Lloyds Metals and Energy – 16-09-2026
फोटो ओळ – गडचिरोली जिल्ह्यातील कोन्सारी येथील लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी कंपनीला महावितरणचे संचालक श्री. धनंजय औंढेकर यांनी भेट दिली. यावेळी मुख्य अभियंता हरीश गजबे व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.























