
पर्यावरण शुद्ध व सुकर ठेवण्याचा धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडचा पुढाकार प्रशंसनीय – वसुमना पंत, जिल्हाधिकारी, चंद्रपूर*
*धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड च्या “अरण्यगर्भ , घनवन (मियावाकी धर्तीवर)” आधारित संकल्पनेचा उदघाटन सोहळा संपन्न*
चंद्रपूर :- एखादा उद्योग हा केवळ आपल्या उत्पादणावर लक्ष केंद्रित करीत नसून पर्यावरणाच्या रक्षणाकरिता “मियावाकी फॉरेस्ट” (घनवन उद्यान) हि संकल्पना घेत विविध प्रकारची वृक्ष व औषधीयुक्त वनस्पतींची लागवड करित आहे हि नक्कीच एक समाधानाची बाब आहे. पर्यावरणाला जिवलग मित्र समजणारे उद्योग पाहून अतिशय आनंद झाला असे भावोद्गार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी काढले. धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड च्या ३.२ एकर क्षेत्रात होत असलेल्या “अरण्यगर्भ” मियावाकी फॉरेस्टच्या धरतीवर उभा असलेला घनवन उद्यान उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड च्या वतीने पूर्वी १.५ एकर क्षेत्रात केलेल्या वृक्षारोपण व ३.२ क्षेत्रात लागवड केलेल्या १८,000 वृक्षारोपण कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले. प्रसंगी उद्योगाचे प्लांट हेड देवेश कुमार, महाव्यवस्थापक पुंडलिक वानवे, उपमहाव्यवस्थापक दिनेश गाखर, श्रीकांत श्रीवास्तव, अमोल गिरडकर, उपव्यवस्थापक रवी चावरे यांची विशेष उपस्थिती होती.
वृक्षारोपण, त्यांचे संवर्धन करून पर्यावरण शुद्ध व सुकर ठेवणे हि आज काळाची गरज आहे. पर्यावरण सदैव समाजास नेहमीच देत आले याचे कर्ज आपण केवळ वृक्ष लागवड व त्याचे संगोपन करूनच फेडू शकतो. उद्योग हा केवळ उत्पादनासाठी नाही तर पर्यावरण समृद्ध ठेवण्यासाठी ओळखला जावा. प्रदूषण कमी करण्यात उद्योगाची भागीदारी असेल तर प्रदूषण मुक्त क्षेत्र घडविण्यास नक्कीच मदत होईल असेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपल्या संबोधनातून सांगितले.
घनवन मियावाकी फॉरेस्ट हि संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी उद्योग चमूने अत्यंत प्रभाविपणे व तळमळीने हे कार्य केले असून आज उभे असलेले हे उद्यान त्यांच्या मेहनतीचे प्रतीक असल्याचे प्लांट हेड देवेश कुमार यांनी यावेळी आपल्या संबोधनातून सांगितले. उद्योग व्यवस्थापन भविष्यात वृक्षारोपण विषयी अधिक प्रभावी पद्धतीने कार्य करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
या उदघाटन सोहळ्याला उपमहाव्यवस्थापक भूपेंद्र तोमर, मुख्य व्यवस्थापक संदीप ठाकरे, मनोज कुमार, डॉ. अनिष नायर, सौगतो मुखर्जी, संजीत रावत, व्यवस्थापक सुरेश देवांगन, हेमंत निमकर, संतोष काकडे, हर्षल फुलबांधे, उपव्यवस्थापक हर्ष तोमर यांची व अन्य अधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.






















