
इटोली : मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. उच्च प्राथमिक शाळा, इटोली येथे विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. मा. ज्योतीताई वेलके यांच्या सौजन्याने मा. सपनाताई मुनगंटीवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण करण्यात आले.
याचवेळी मा. सपनाताई मुनगंटीवार यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला. शिक्षणासोबतच निसर्गाची जपणूक करण्याची प्रेरणा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली.
नोटबुक मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर वृक्षारोपणामुळे शाळेच्या परिसरात हिरवाईची नवी आशा निर्माण झाली. “विद्यार्थ्यांच्या हातात लेखणी आणि शाळेच्या अंगणात हिरवाई” असा सुंदर संगम या उपक्रमातून साधण्यात आला.
कार्यक्रमास मा. तुळशीदासजी पिपरे (सरपंच, इटोली), शुभांगी माडूरवार, रामप्रकाश पिपरे, पंकज सिडाम, निळकंठ सरवर, स्वप्नील सिडाम, मायाताई पिपरे, चंद्रकलाताई बोबाटे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता दरेकर, शिक्षिका अनुपमा गेडाम, माधुरी कोरडे, अमीना खान, उर्मिला कावरे तसेच इतर शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि शाळेच्या परिसरात वृक्षारोपण अशा दुहेरी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, शिक्षणाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.























