Home देश-विदेश Spain Ceuta Migration: 24 तासांत 60000 स्थलांतरित समुद्रमार्गे पोहत पोहोचले; सीमेवर अनागोंदी,...

Spain Ceuta Migration: 24 तासांत 60000 स्थलांतरित समुद्रमार्गे पोहत पोहोचले; सीमेवर अनागोंदी, सैन्य तैनात, आणीबाणी घोषित

3

spain Ceuta Migration: गेल्या २४ तासांत तब्बल ६० हजार जणांनी स्थलांतर करत समुद्र मार्गानं घुसखोरी केली आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून आणीबाणीची घोषणा करण्यात आलेली आहे.

 

माद्रिद: भौगोलिकदृष्ट्या उत्तर आफ्रिकेत असलेल्या पण प्रत्यक्षात स्पेनचा भाग असलेल्या सेऊटा शहरात प्रचंड मोठी घुसखोरी झाली आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभरात मोरक्को देशातून तब्बल ६० हजार जणांनी सीमा ओलांडून सेऊटामध्ये प्रवेश केला. समुद्रातून पोहत येत मोरक्कोतील हजारो जणांनी सेऊटा गाठलं. या सगळ्यात ४१ जणांचा बळी गेला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर स्पेन सरकारनंतर सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.

मोरक्कोतील तब्बल ४९ हजार लोकांनी स्पेनच्या सेऊटामध्ये शिरकाव करण्यास जुलैच्या अखेरीच्या आठवड्यापासून सुरुवात केली. तराजल बॅकवॉटरच्या जवळ असलेल्या समुद्रात उतरून हजारो लोकांनी पोहत पोहत सेऊटाचा किनारा गाठला. बऱ्याच जणांनी टायर ट्युबचा वापर केला. काहींनी किनारी भागातून पायपीट करत सेऊटा गाठलं. अनेक ठिकाणी तारांचं कुंपण तोडून सेऊटामध्ये प्रवेश करण्यात आला. विस्थापितांचा लोंढा प्रचंड प्रमाणात समुद्र मार्गानं आल्यानं सीमेवर तैनात असलेले सिव्हिल गार्ड लाचार दिसले. सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असल्यानं हजारो विस्थापतांना रोखणं त्यांना अवघड गेलं