Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस वृक्षारोपण, पूजन व महाप्रसादाने उत्साहात साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस वृक्षारोपण, पूजन व महाप्रसादाने उत्साहात साजरा

6
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौक परिसरात वृक्षारोपण, हवन-पूजन व महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
यावेळी जनता कॉलेज परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर स्थानिक हनुमान मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी वाटचालीसाठी हवन आणि विशेष पूजन करण्यात आले. पूजनानंतर उपस्थित भाविक व नागरिकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी विविध सामाजिक, राजकीय व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अशोक जीवतोडे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. वृक्षारोपणासह सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी माजी महापौर सौ. राखीताई कांचरलावार, माजी नगरसेवक देवानंद वाढई, प्रकाश देवतळे, प्राचार्य डॉ. आशिष महातळे, रवि देवाळकर, मयूर हेपट, दिलीप कार्लेवार, उदय बाम, पवन देशट्टीवार, श्रीधर समरिन, सागर कांत, प्रभाकर निंदेकर, प्रमोद ठोंबरे, धर्मेंद्र पंडित, रवि जोगी, मंगेश अहिरकर, शुभम घाटे, सचिन दिघाडे तथा मोठ्या संख्येने परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रसार माध्यम प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
वृक्षारोपण, धार्मिक विधी आणि महाप्रसादाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामाजिक संदेश देत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.