
चंद्रपूर; राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ‘ सेवा संकल्प अभियान’ राबविले जात आहे. सेवा आणि समाजकल्याणाचा हाच संदेश पुढे नेण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्री अकुनुरी नरेश व माननीय सहा आयुक्त श्रीमती शुभांगी सूर्यवंशी यांचा प्रतक्ष मार्गदर्शनात आरोग्य विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सौ. नयना उत्तरवार यांचा द्वारे ‘वर्ल्ड हार्ट डे’ चे औचित्य साधून शहरातील आझाद गार्डन येथे शहरातील सामान्य नागरीक, आरोग्य विभागातिल वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयं सेविका करिता एका विशेष योग व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महानगरपालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. सौ. नयना उत्तरवार यांच्या माहिती पर भाषणाने सत्राची सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रमुख योग शिक्षक श्री गोपीभाऊ खोब्रागडे (पतंजली योग समिती, जिल्हा चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली योग, प्राणायाम व ध्यानाचे महत्त्व सविस्तर समजावून सांगण्यात आले व योग सत्र घेण्यात आले. योग सत्र घेताना उपस्थितांना प्रत्यक्ष आसनाचे महत्व समजावून सांगितले .
डॉ. सौ. नयना उत्तरवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये हृदयविकार (हार्ट अटॅक) सारखे आजार वेगाने वाढत आहेत त्यासाठी नियमित योग आणि प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. मनावरील ताणतणाव (स्ट्रेस) कमी करण्यासाठी ध्यानाची मोठी मदत होते.
सदर योग सत्रात आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. व्यायाम ही पद्धत नसून निरोगी, शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवन जगण्याची संस्कृती असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आलेण. नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग व ध्यानाचा अंगीकार करून निरोगी समाजनिर्मितीस हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले.




















