Home चंद्रपूर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रम उत्साहात...

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रम उत्साहात संपन्न’

5
’डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रम उत्साहात संपन्न’

 

  भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ तथा एक देश, एक विधान, एक निशाण या अखंड राष्ट्रभावनेचे प्रणेते भारतरत्न डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगर यांच्या वतीने गांधी चौक येथील भाजप महानगर कार्यालयात अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. आपल्या मनोगतात त्यांनी डॉ. मुखर्जी यांचे राष्ट्रहितासाठीचे योगदान, अखंड भारताची संकल्पना, सांस्कृतिक राष्ट्रवाद, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेला त्याग यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून राष्ट्रसेवेसाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भाजप चंद्रपूर महानगरचे जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरनुले, सविता दंढारे, प्रदेश कार्यकारिणी परिषद सदस्य तुषार सोम, नगरसेविका सारिका संदूरकर, दिनकर सोमलकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षा विमल काटकर, निशिकांत महागावकर, सलीम शेख, विनोद पेंलीवार, रीना साखरकर, नफिसा पठाण, माला पेंदाम, साई कोटा, राहुल बोलम, चंद्रराज भुटान, रेवती चौखंडे, ज्योती पाल, मनीषा पडगेलवार, अंजुषा तोरे, गीता डंभारे, हर्षदा गर्गेलवार, प्रशांती पडगेलवार यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते