Home चंद्रपूर विजासन येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत बैलबंडी मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

विजासन येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत बैलबंडी मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

5

द्रपुर (प्रतिनिधी) दिनांक 03/07/2026 पंचायत समिती भद्रावती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, विजासन व तालुक्यातील सर्व शाळामधुन नवीन शैक्षणिक वर्षांत नवागत विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची आनंददायी सुरुवात व्हावी या उद्देशाने विविध आकर्षक उपक्रम राबविण्यात आले.

जिप शाळा विजासन येथील   कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सहा.गटविकास अधिकारी डॉ.बंडू आकनुरवार यांनी केले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर होते.प्रमुख पाहुणेनगरपरिषद उपाध्यक्ष सुधीरभाऊ सातपुते,नगरसेविका शिलाताई कुळमेथे, रितूताई अडबले अंबुजा फाउंडेशन, गजाननजी कामतवार अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती,सौ.उषाताई कन्नाके उपाध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती,जगनजी दानव, सुरजभाऊ उमाटे,शिवरकरजी उपस्थित होते.गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील जिप शाळेत व चिरादेवी जिप शाळेत उपस्थितीत शाळाप्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आले.

प्रथम पाहुण्यांच्या हस्ते नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची मंगल सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लेझीमच्या तालावर विद्यार्थीचे स्वागत करून त्यांना मंचावर आणण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी डॉ.बंडु आकनुरवार,डॉ.प्रकाश महाकाळकर,सुधीरभाऊ सातपुते यांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, संस्कार, गुणवत्तापूर्ण अध्ययन व उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. नवप्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण व शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक दोन आयोजित करण्यात आले.कार्यक्रमानंतर सजविलेल्या बैलगाडीतून नवागत विद्यार्थ्याची ढोल तासाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ अनिता दशरथ पेंदाम संचालन सौ.विद्ये मॅडम  आभार निलगिलवार सर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ.अनिता दशरथ पेंदाम,कु अमृता जीवने, कु.सीमा वांदिले,  कु.सुनिता चांदेकर या शिक्षिकांनी व बैलबंडी मालक जगदिश ढवस यांनी सहकार्य केले.